‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा!’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा!’ या अभियानांतर्गत आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे यांनी 11 ऑक्टोबर 2017 रोजी देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडा विरोधी अभियान इत्यादी मागील अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्या, युवतींना होणारी छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, शैक्षणिकप्रश्‍न, युवक-युवतींची […]

Read More ⇾

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ‘जेलभरो’ जन आंदोलन

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 14 सप्टेंबर 2015 रोजी राज्यभर ‘जेलभरो’ जन आंदोलन करण्यात आले. मा.ना.दिलीपजी वळसे पाटील व माझ्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करमाड येथे सदरील आंदोलन करण्यात आले. करमाड गावातील औरंगाबाद-जालना मार्गावर या आंदोलनाला पाच हजार शेतकरी बांधव शेकडो बैलगाड्या आणि शेकडो जनावरे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

Read More ⇾

उप मुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या ‘संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन

उप मुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्यासोबत औरंगाबाद येथे ‘संवाद’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात औरंगाबाद शहरातील काही निवडक शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, उद्योजक, साहित्यिक, वकील आदींना एकत्र आणून मराठवाड्याच्या विकासावर विचार मंथन केले. या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी मराठवाड्याच्या विविध समस्यांबाबत दादांशी थेट संवाद साधला.

Read More ⇾

मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा दुष्काळ परिषद

मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 16 मे 2016 रोजी औरंगाबादेत देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा दुष्काळ परिषद घेण्यात आली. या परिषदेत आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या 141 कुटुंबियांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे बियाणे व पेरणीसाठी प्रत्येकी पंधरा हजारांची मदत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांसह पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

Read More ⇾

माजी न्यायमूर्ती मा.बी.एन.देशमुख गौरव समारंभ

राज्याच्या विधी, न्याय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या माजी न्यायमूर्ती मा.बी.एन.देशमुख यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केल्याबद्दल 28 ऑगस्ट 2016 रोजी त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते औरंगाबाद येथे हा गौरव समारंभ पार पडला.

Read More ⇾

प्राच्यविद्यापंडित डॉ.आ.ह.साळुंखे अमृतमहोत्सवी गौरव समारंभ

महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक, प्राच्यविद्यापंडित डॉ.आ.ह.साळुंखे यांचा 20 डिसेंबर 2018 रोजी देवगिरी महाविद्यालयात अमृतमहोत्सवी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वराज इंडियाचे अध्यक्ष डॉ.योगेंद्रजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या गौरव समारंभास औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

Read More ⇾

‘संविधान बचाओ, देश बचाओ! कन्हैय्या कुमार यांची जाहीर सभा

‘संविधान बचाओ, देश बचाओ!’ या मोहीमेअंर्गत जेएनयूतील विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष व एआयएसएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैय्या कुमार यांची औरंगाबाद शहरात 9 डिसेंबर 2018 रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आमखास मैदान येथे झालेल्या या सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read More ⇾

आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्ष पूर्णझाल्याबद्दल मराठवाड्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार

राष्ट्रवादी काँगेसपार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्ष पूर्णझाल्याबद्दल दि.29 जुलै 2017 रोजी त्यांचा मराठवाड्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग, नौकानयन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते आदरणीय शरद पवार साहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून […]

Read More ⇾

सुवर्णगाथा-50 राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व तसेच शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन

आदरणीय शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला दि.22 फेबु्वारी 2017 रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाले. या पाच दशकांमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले. अनेक प्रकल्प उभे राहिले, सर्वसामान्य माणसांचा विकास केंद्रस्थानी मानून आदरणीय शरद पवार साहेबांचे कार्य व विचार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता साहेबांच्या कायदेमंडळातील पन्नाशीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सुवर्णगाथा-50 राज्यस्तरीय महाविद्यालयीन […]

Read More ⇾

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे शैक्षणिक सहल

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशभरातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विविध अभ्यासक्रमांसाठी येथे प्रवेश घेतात. तिथे विद्यार्थी कशा पध्दतीने अध्ययन, संशोधन करतात, विद्यार्थ्यांना कोणत्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळतात याची माहिती मराठवाड्यातील आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी 2014 मध्ये मी शैक्षणिक सहल आयोजित केली होती. मी स्वतः […]

Read More ⇾